Friday 30 August 2013

माय


प्रिय लेकरा, 
अस्तित्व शून्य असता 
तू हाक का मारिशी?
झिडकारीशी,विस्मरशी
परी मी सदैव तव उराशी ||१||

असते तुझ्याचसाठी 
सारेच माझे जीणे
झिजणे आयुष्यभर अन 
मरणे तुझ्याचसाठी ||२||

काटा  तुझ्याच पायी
परी विव्हळ देरे मजला 
भगवंत चरणी नमता
आयुष्य माझे तुजला ||३||

अश्रूत मात्र तुझिया
प्रतिबिंब आज माझे
अभिमान सार्थ मजला
परी दुःख तव अश्रुंचे  ||४||

बेधुंद मनाची नाती 
या अश्रूंतून जी फुलती
ती इवली पाउले स्मरती
मज "माय-माय" जी म्हणती ||५||

प्रिय आई,
मी तुझा,तू माझी
मी प्रतिपदा,तू पोर्णिमा माझी
मी याचना,तू  पूर्तता माझी
मी तहान,तू सरिता माझी  ||६|| 
मज जन्म आर्द्र हा आहे,
मायेने, प्रेमाने तुझिया.
तू कवेत घे मम क्षितिजा,
मज जन्म-सार हा आहे. ||७||

मज शब्द्सागरालाही 
सीमा येथेची मिळते.
मी शब्द लेखिता " आई ",
ती लेखा तेथीची थमते. ||८||
आई सागराची माझा 
आकंठ बुडलो जेथे 
लिखाणे उद्देश्य तेथे 
विरू लागले ||९||

                                          -मुकुंद.

No comments:

Post a Comment