Thursday 15 August 2013

अन..

काच तडकली चष्म्याची अन ..
रंग पसरले जीवनी
राजा रंगांचा चाचपडे अन..
अंधार माझ्या जीवनी

अंधारी रंगला राजा आता
उजेड नको मज वाटतो
उजेडा ठेवतो नवे अन..
वाट मी मिलनाची पाहतो

काळाची बाहुली मीही
तुज आणखी काय ते सांगायचे
सावरू शकेना स्वतःला अन..
वचन तुज आधाराचे द्यायचे?

रंगहीन जुने ती स्वप्ने
आता डोळाही न लागे माझा
आस नव्या घावाची अन..
पूर्वीचा तो आजही ताजा

जोडूनी कळीजे मृगनयनी
मित्रानो आत्मदाह करू नका
जालीम जगी हि स्त्री मदिरा
जिये स्पर्श तुम्ही कच करू नका

तो घाव कोरूनी रुधीराने
मी आर्जव आज हि केली असे
मृगजळे पसरली जगती अन..
प्रेमाला येथे ठाव नसे
प्रेमाला येथे ठाव नसे........  -मुकुंद.

No comments:

Post a Comment